जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दौंड’मध्ये वृक्षारोपण

दौंड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, दौंड येथिल ‘वी आर स्कॅवेंजरस्’ स्वयंसेवक ग्रुप व महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपणा साठी ‘वी आर स्कॅवेंजरस्’ च्या स्वयंसेवकांनी मागिल एक आठवड्यापासून येथिल गुप्तेश्वर वनक्षेत्रात स्वतः श्रमदान करून १७५ खड्डे तयार केले.

कार्यक्रमास स्वयंसेवकांनी व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद देत १५० रोपं लावली. या वेळेस ‘वी आर स्कॅवेंजरस्’ ग्रुपचे सर्व स्वयंसेवक, वनरक्षक मगर , सावंत , गायकवाड , निखिल गुंड, गोकुळ गवळी, वन कर्मचारी दळवी, देशमाने, कांबळे, झिटे व इतर कर्मचारी उपस्थित होते. या सोबतच दौंड पोलीस स्टेशनचे पो.उप. निरीक्षक शहाजी गोसावी, अबनावे, पोलीस कर्मचारी देवकाते व गावडे यांनीही वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.