काय ! आरोप करणारे सोमय्याच आले अडचणीत..? एकीकडे सोमय्यांविरोधात हक्कभंगाची नोटीस तर दुसरीकडे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

मुंबई : आपल्या खास शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेणारे आणि आपल्या आरोपांनी बेजार करणारे किरीट सोमय्या आता काहिशे अडचणीत आल्याचे दिसत आहे. किरीट सोमय्या यांना सलग दोन धक्के बसले आहेत.

पहिला धक्का म्हणजे अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात हक्कभंग नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये अनिल परब यांनी, मी म्हाडामध्ये राहिलो, तेथील लोकांनी मला कार्यालय वापरायला दिले. ते बेकायदेशीर बांधकाम आहे अशी नोटीस मिळाल्यानंतर मी म्हाडाला स्पष्टीकरण दिलं कि ती जागा माझी नसून सोसायटीची आहे. ती नोटीस म्हाडाने मागे घेतली पण किरीट सोमय्या यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन माझी प्रतिमा मलीन केली आणि मी म्हाडाचा भूखंड खाल्ला असा आरोप करत राहिले. त्यामुळे मी त्यांच्यावरती हक्काभंगाची नोटीस बजावली आहे अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

सोमय्या यांना दुसरा धक्का म्हणजे, सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केले. त्यांच्याबाबत जी माहिती दिली त्यावरून न्यायालयाने सोमय्या यांना तुम्ही ही कागदपत्रे (FIR) कुठून मिळवली असा प्रश्न उपस्थित करत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विरोधकांना आरोपांनी बेजार करणारे सोमय्या हे आता विरोधकांच्या रडारवर आल्याचे दिसत आहे.