पुणे : राज्यात आम्हाला स्पष्ट बहुमत होतं मात्र तरीही सरकार यांनी (राष्ट्रवादी,शिवसेना,काँग्रेस) बनवलं हा सत्तेचा दुरुपयोग नाही का..! असा सवाल केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला.
आमच्यावर सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप होतो मात्र तो साफ चुकीचा असून आम्हाला स्पष्ट बहुमत असूनही यांनी सरकार स्थापन केलं हा खरा सत्तेचा दुरुपयोग असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
पुण्यात कार्यक्रमाला उपस्थित असताना एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि राज्यसरकार यांच्यावर टीका केली आणि पेट्रोल, डिझेलचे भाव वाढण्यास केंद्र सरकार जबाबदार नाही तर त्यास आंतराष्ट्रीय पातळीवरील इंधनदर कारणीभूत असून त्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने दरवाढ होते. त्यामुळे यात केंद्र सरकार मुद्दाम काही करत नाही आणि असं करणारही नाही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचं आणि राज्यातील मंत्र्यांना त्रास देत असल्याचे म्हटले होते त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.