दौंड मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवास प्रारंभ, रक्तदान शिबिराचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. जयंती निमित्ताने दौंड मधील दलित संघटनांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज दि. 8 एप्रिल रोजी येथील रमापती कानडी समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आईनेच घेतला दोन चिमुरड्यांचा जीव

शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष फीलीप अँथोनी, माजी नगरसेवक गौतम साळवे तसेच गोविंद अग्रवाल, राजू गायकवाड, श्रीकांत थोरात, मीराभाऊ म्हेत्रे, जयदीप बगाडे, रियाज पटेल, सुरेश सकट आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये 48 रक्तदात्या मित्रांनी रक्तदान केले.

ओम ब्लड बँक (शिरूर) यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. रमापती कानडी समाजाचे अध्यक्ष सुरेश येरमाळे, रमापती नगर जयंती उत्सवाचे अध्यक्ष शिवसंगेकर व पांडुरंग गडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरास धरम बनसोडे, भुजंग बनसोडे, अंजप्पा येरमाळे, शिवकुमार संगेपान, वीरेंद्र वाघमारे ,महेश कांबळे ,ओंकार गडेकर ,राम सुगुर, आजाप्पा येरमाळे, रघु धिरडकर, अनिल कमाने, राजू भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ती हत्याच..

संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या वतीने व दीपक सोनवणे यांच्या पुढाकाराने जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिद्धांत म्युझिकल नाईट, जल्लोष भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.