दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे एक दुःखद घटना घडली असून येथील नामांकित विनायक त्रिंबक अत्रे उर्फ अत्रे काका यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
ही घटना सायंकाळी 5:30 च्या दरम्यान केडगाव रेल्वेस्टेशन जवळ घडली असून विनायक अत्रे यांनी मालगाडीखाली झोपून आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले होते. याबाबतची माहिती रेल्वे पोलीस टिंगरे यांनी दिली आहे.
रेल्वे किमी 249/ 9-10 या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली आहे. अत्रे काका म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.