मुंबई : आज मराठी सिनेसृष्टीतील मिनी लक्ष्या म्हणजेच दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. आज दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी निधन त्यांचं कर्क रोगाने झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी मराठी रसिकांना मोठा धक्का बसला आहे.
चष्मेबहाद्दर, हळद रुसली कुंकू हसलं, पोलीसलाईन, ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. लक्ष्या नंतर पुन्हा एक कॉमेडी आणि गंभीर भूमिका करणाऱ्या या कलाकारामुळे मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनावर मराठी चित्रपट सृष्टी आणि बॉलीवूड मधून शोक व्यक्त केला जात आहे.
विजय कदम हे एक उत्कृष्ठ कॉमेडीयन आणि रंगभूमीचे कसलेले कलाकार होते. त्यांचं विच्छा माझी पुरी करा, हे लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हे दोन कार्यक्रम खूप गाजले. टूरटूर ‘रथचक्र’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.