दौंड तालुका अध्यक्ष पदाच्या शर्यतिमध्ये ‘उत्तमराव आटोळे’ यांचे पारडे ‘जड’..?

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर आता अजितदादा गटाच्या दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदासाठी निवड चाचणी सुरु झाली आहे. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असली तरी यात सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव हे रावणगाव येथील उत्तमराव आटोळे यांचे असल्याचे गुप्त सूत्रांकडून समजत आहे. यावेळी दौंड तालुकाध्यक्ष पदासाठी त्यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तम आटोळे हे माजी आमदार रमेश थोरात यांचे खंदे समर्थक असून या अगोदर त्यांनी
पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. दौंड तालुक्यामध्ये त्यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून शांत, सय्यमी मात्र तितकीच राजकीय चातुर्य असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेऊन हि निवड केली जाणार असल्याने या निवडीला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये उत्तमराव आटोळे यांचे नाव आघाडीवर असून तालुका अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे लवकरच समजणार आहे.

यांचीही नावे चर्चेत – तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतिमध्ये नितीन दोरगे (भांडगाव) संभाजी ताकवणे (पारगाव) दिलीप हंडाळ (केडगाव) यांचीही नावे चर्चेमध्ये आहेत. हे सर्वजण माजी आमदार रमेश थोरात यांचे कट्टर समर्थक असून सध्या सर्वात जास्त चर्चा हि उत्तमराव आटोळे यांच्या नावाची होताना दिसत आहे.