दौंड : दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने दौंड शहरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लाडू वाटून जल्लोष करण्यात आला.
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या रमेश थोरात यांनी सलग आठव्यांदा पुणे जिला मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाली आहे. दौंड शहरात त्यांच्या बिनविरोध निवडीची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात विविध ठिकाणी लाडू वाटप करून फटाक्याची अतिषबाजी केली आहे.
यावेळी बादशहा शेख, हाजी सोहेल खान, गुरमुख नारंग, वसीम शेख, राजेश जाधव, प्रशांत उर्फ सोनू धनवे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.