लोणीकाळभोर : चारचाकी वाहनांचे सायलेंसर चोरून ते विकणाऱ्या टोळीला लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या टिमने मोठ्या शिताफिने जेरबंद केले आहे.
लोणीकाळभोर येथे मारुती सुझुकी ईको या चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर चोरीचे
अनेक गुन्हे दाखल असुन त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास सदर चोऱ्यांचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेले आदेशाप्रमाणे तपास पथक प्रमुख सपोनि/राजु महानोर यांनी तपास पथकातील अंमलदार यांच्या टिम तयार करुन त्यांना सायलेन्सर चोरीच्या गुन्हयाचा समांतर
तपास करणेबाबत आदेशीत केल्यावरुन तपास करीत असताना पोलीस
अंमलदार पो.ना/संभाजी देविकर यांना दि.१६/०४/२०२२ रोजी बातमीदारा मार्फत सायलेंन्सर चोरणारे चोरटे हे उरुळीदेवाची गावच्या हद्दीत हददीत येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी वपोनि/राजेंद्र मोकाशी व सपोनि/राजु महानोर यांना कळवुन वरिष्ठांचे आदेशान्वये इतर पोलीस अंमलदार यांचेसह
उरुळीदेवाची गाव हददीत सापळा रचुन आरोपी १) शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (वय २१ वर्षे, रा.गोपाळपुरा,आळंदी ता.खेड जि.पुणे) v २) राम राजेश ढोले (वय २० वर्षे,रा.आळंदी ता.खेड जि.पुणे) यांना
ताब्यात घेवुन अटक केली. आरोपिंकडे सखोल तपास केला असता गुन्हयात वापरलेली स्वीफ्ट कार व चोरलेले
एकुण १४ सायलेन्सर, व जाळुन तोडुन फोडुन मिळवलेला सायलेन्सरचे कनव्हर्टर मधील धातुमिश्रीत चुरा असा एकूण 3 लाख 70 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच आरोपिंनी लोणीकाळभोर
पोलीस स्टेशन येथील खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
१) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. २५६/२०२१ भा.द.वि.क.३७९
२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. २८९/२०२१ भा.द.वि.क.३७९
३) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. २५/२०२२ भा.द.वि.क.३७९
४) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १२९/२०२२ भा.द.वि.क.३७९
५) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३०/२०२२ भा.द.वि.क.३७९
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/महेश भोंगळे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा.श्री.अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त,पुणे शहर,मा.श्री.डॉ.रविंद्र शिसवे सह पोलीस आयुक्त,पुणे शहर,मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक
विभाग,पुणे शहर,मा.नम्रता पाटील,पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-५,मा.बजरंग देसाई,सहा.पोलीस आयुक्त,हडपसर विभाग,राजेंद्र मोकाशी,वरीष्ठ पोलीस निरीक्षक,सुभाष काळे पोलीस निरीक्षक(गुन्हे)
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी सपोनि/राजु महानोर,यांचे सोबत पोहवा/नितीन गायकवाड,संतोष होले,पोना/सुनिल नागलोत श्रीनाथ जाधव,संभाजी देविकर,अमित साळुखे,महेश भोंगळे,पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे,बाजीराव विर,शैलेश कुदळे,निखील पंवार,दिगंबर साळुके, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.