Breaking News | वरवंड जवळ दोन ‘एसटी बस’ मध्ये भीषण ‘अपघात’ | 40 जण जखमी, आमदार ‘राहुल कुल’ यांच्या घटनास्थळावरून प्रशासनाला सुचना

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे दोन एसटी बस चा भीषण अपघात घडला आहे. या अपघातमध्ये तब्बल 40 जण किरकोळ, गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वरवंड गावाजवळील कौठीचा मळा येथे घडला आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार वरवंड गावच्या हद्दीत असणाऱ्या कौठीचा मळा या ठिकाणी या दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात घडला. सोलापूर च्या दिशेने जाणाऱ्या एस टी बस ला एका दुचाकीस्वार आडवा आला त्यास वाचविण्यासाठी ती बस दुभाजकाच्या दुसऱ्याला बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला ती जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही बसेसमधील साधारण 40 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. अपघातस्थळी दौंडचे आमदार राहुल कुल आणि पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांसह यवत पोलिसांनी भेट देत मदत कार्य सुरू केले आहे. आमदार राहुल कुल यांनी प्रशासकीय यंत्रनेला सुचना करत जखमिंना योग्य त्या रुग्णालयात दाखल करून त्वरित उपचार करण्याच्या सुचना केला आहेत.

अपघातस्थळी उभ्या बस अण मदतकार्यासाठी उपस्थित आमदार राहुल कुल

अपघात झाल्यानंतर परिसरातील सुमारे पाच रुग्णवाहिका जखमींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी हजर झाल्या होत्या. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी एकमेकांना धडकल्यानंतर या एसटी आणि प्रवासी बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला आहे.  घटनास्थळी दौंड चे आमदार राहुल कुल हे उपस्थित असून जखमींच्या मदतीसाठी त्यांनी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या आहेत.