दौंड : पारगाव (ता.दौंड) येथील एटीएम मशीन स्फ़ोटके लावून तीनवेळा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र नागरिकांची चाहूल लागल्याने तिनही वेळा हा प्रयत्न फसला होता. मात्र पोलिसांनी गुप्तपणे तपास करत अखेर हि टोळी जेरबंद केली आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव येथे स्फ़ोटके लावून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे सदरच्या गंभीर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत करण्यात येत होता.
पोलिसांच्या तपासादरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी 1) विशाल छबु पल्हारे (वय-20 रा.हांगेवाडी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर) याने त्याचे इतर साथीदार
- आदित्य प्रदीप रोकडे (वय-20 रा.चिंचणी ता.शिरूर जि.पुणे)
- अनिकेत संजय शिंदे (वय -20 रा.बोरी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर)
- आदित्य खोमणे (रा.मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे) यांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी वरील आरोपिंना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी एकूण तीन वेळा पारगाव येथील एटीएम मशीन स्फोटक पदार्थाच्या सहाय्याने उडवून देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे.
या आरोपिंकडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.
1.यवत पो.स्टे. गु.र.न. 468/2023 भा.द.वि. कलम 379,511,427,34 .स्फोटक पदार्थ अधिनियम कायदा 1908 कलम 4
2.यवत पो.स्टे. गु.र.न. 728/2023 भा.द.वि. कलम379,511,427,34 स्फोटक पदार्थ अधिनियम कायदा 1908 कलम 4
3.यवत पो.स्टे. गु.र.न. 895/2023 भा.द.वि. कलम 379,511,427,34 स्फोटक पदार्थ अधिनियम कायदा 1908 कलम 4
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सपोनी राहुल गावडे पोसई गणेश जगदाळे, स.फौ तुषार पांधारे, पो हवा सचिन घाडगे, जनार्दन शेळके,आसिफ शेख,योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक कापरे करीत आहेत.