चोरट्यांनी घरासमोरून ‘चोरून’ नेली, मात्र ‘लक्ष्मी’ होती म्हणून ‘परत’ आली

अब्बास शेख

दौंड : चोरीला गेलेली एखादी वस्तू पुन्हा सापडेल कि नाही याची शास्वती नसते आणि त्यातल्या त्यात जर ते वाहन असेल तर मात्र त्या सापडण्याच्या आणखीनच आशा धूसर होत जातात. मात्र याला काही लोक अपवाद असून आणि याचा प्रत्यय सहजपूर येथील सचिन साहेबराव भगत यांना आला आहे.

तर झाले असे कि, सचिन भगत यांच्या घरासमोर लावलेली बोलेरो जीप तीन अज्ञात चोरट्यांनी दि.30 ऑगस्ट रोजी रात्री 12ः30 च्या सुमारास चोरी केली. सचिन भगत यांचे घर सहजपुर (ता.दौंड) या गावच्या हद्दीत असणाऱ्या सहजपुर फाट्यावर आहे. गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच भगत यांनी पोलिसांत धाव घेतली आणि अगोदर फिर्याद दाखल केली आणि गाडीचा शोध सुरु केला.

गाडीचा शोध सुरु असतानाच त्यांची गाडी ही त्या तीन चोरट्यांनी हडपसर च्या रामटेकडी जवळ सोडून पळून गेल्याचे त्यांना समजले. आपली गाडी म्हणजे आपली लक्ष्मी असते असे शेतकरी वर्ग मानतो आणि चोरीला गेलेली ती लक्ष्मी पुन्हा सापडणे म्हणजे नशीबच. चोरीला गेलेली गाडी पुन्हा सापडल्याने भगत कुटुंबियांचा आनंद गगणात मावत नव्हता.