दौंड : दौंड तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी नानविज पोलिस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य श्री. ठाकूर, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ५ चे सहाय्यक समादेशक श्री. सुनील सरोदे, उपविभागीय अधिकारी श्री. मिनाज मुल्ला, तहसीलदार श्री. अरुण शेलार, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापूराव दडस, दौंडचे पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार, यवतचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख, मुख्याधिकारी तथा प्रशासक दौंड नगरपालिका श्री. कावळे, उपभियांता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. हरीश्चंद्र माळशिकारे, श्री. मयूर सोनवणे, उपभियांता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना श्री. चेतन शिंदे, उपभियांता जिल्हा परिषद बांधकाम विभाग श्री. दत्तात्रय पठारे, महा. जीवन प्राधिकरण, पुणे, जलजीवन मिशन, पुणे चे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली
⭕ नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजना, जलनिस्सारण योजना व अंर्तगत रस्त्यांच्या साठीचा एकत्रित आराखडा एक महिन्यात तयार करावा,
⭕ राज्य राखीव पोलीस बल गट क्र ५ व ७ तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा आरखडा तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या,
⭕ तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची कामे तातडीने सुरु करावीत आवश्यक निधीचा प्रस्ताव तसेच उपक्रीडा संकुलांसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव तयार करण्यात यावा
⭕ नाट्यगृहासाठी जागा हस्तांतरण आवश्यक निधीसाठी अंदाजपत्रक, तयार करण्यात यावे
तालुक्यातील सर्व शासकीय इमारतीसाठी आवश्यक जागांचे प्रस्ताव तयार करून ते शासनास सादर करावेत
⭕ दौंड पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे काम पुढील आठवडाभरात सुरु करावे
तसेच तालुक्यातील इतर सर्व प्रस्तावित, मंजूर व प्रगतीपथावर असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली, विकास कामे व शासकीय योजनांच्या आढावा घेण्यात आला. यावेळी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार राहुल कुल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.