पुणे : यवत (ता.दौंड) येथील तत्कालीन कामगार तलाठी कैलास बाठे यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. कैलास बाठे हे यवत येथील तत्कालिन तलाठी असून सध्या ते तहसिल कार्यालय पुरंदर येथे कार्यरत आहेत. बाठे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम-४ च्या (१)(अ) अन्वये शासन सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याअनुषंगाने त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम-४ च्या (१) (अ) अन्वये निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करणेचा आदेश प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडून पारीत करण्यात आले आहेत.
तत्कालीन कामगार तलाठी कैलास बाठे यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या दोन प्रकरणांमध्ये तहसिलदार दौंण्ड यांचेमार्फत दोषारोप पत्र सादर करणेत आलेले होते. एका प्रकरणामध्ये समीर शब्बीरभाई सय्यद (रा. यवत) तसेच रमेश शंकर ढमढेरे, सुशांत हरीभाऊ दिवेकर, बाळासाहेब श्रीरंग खोपडे व विलास हरीभाऊ नागवडे असे तक्रार अर्जदार आहेत. तसेच दुसऱ्या प्रकरणामध्ये समीर शब्बीरभाई सय्यद (रा.यवत) हे तक्रार अर्जदार आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये तहसिलदार पुरंदर यांची चौकशी अधिकारी म्हणून व महसूल नायब तहसिलदार दौंड यांची यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमणूक करणेत आलेली होती. त्यानुषंगाने तहसिलदार पुरंदर यांनी वरील दोन्ही प्रकरणांचा चौकशी अहवाल संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये कार्यालयास सादर केलेला होता. यावेळी तक्रार अर्जदार आणि तलाठी कैलास बाठे यांनी त्यांचे म्हणणे सादर केलेले होते. यावेळी दाखल सर्व कागदपत्रे, तसेच प्रकरण (अ) व (ब) मधील सर्व तक्रार अर्जदार यांचे प्रकरणी सादर लेखी म्हणणे, तसेच चौकशी अधिकारी तहसिलदार पुरंदर यांचा अहवाल यांचे अवलोकन करून यवत चे तत्कालीन तलाठी कैलास बाठे यांचेवर मा. जिल्हाधिकारी यांनी कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करणेबाबत कळविले आहे.
तसेच तलाठी कैलास बाठे यांना चौकशी अधिकारी यांनी दि.२२/३/२१ तसेच दि.५/४/२०२१ तसेच दि.१७/३/२१ व दि.७/४/२०२१ रोजी त्यांची बाजु मांडायला संधी देवूनही त्यांनी बाजू मांडली नाही. तसेच २९ दस्ताचे फेरफार तयार केले नाहीत. नोटीस काढणे (१) आणि नोटीस बजावणे (१९) फेरफार प्रलंबित ठेवले. फेरफार क्र.९९८१ कोणताही व्यवहार झालेला नसताना, खातरजमा न करता, दुसऱ्या गावाचा दस्त असूनही नोंद धरली होती. एकुणच ०५ तक्रारदार यांचे म्हणणे तहसिलदार दौण्ड, तहसिलदार पुरंदर, महसूल नायब तहसिलदार
दौण्ड यांचे म्हणण्यानुसार कैलास बाठे (तत्कालिन तलाठी यवत) यांनी महसूल खात्याची प्रतिमा जनमानसात मलिन केलेली आहे. त्यामुळे त्यांचेवरील आरोप हे सिध्द होत असून, त्यांचे या कृतीमुळे शासकीय कामकाकाजात त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे. तसेच त्यांचे वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झालेली आहे. त्यामुळे त्यांचे पदाचे कर्तव्यात नितांत सचोटी कर्तव्य परायणता न राखता महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) १९७९ चे नियम ३ मधील तरतूदींचे उल्लंघन केलेले आहे. तरी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) अधिनियम १९७९ मधील तरतूदीनुसार ते कारवाईस पात्र असलेचे चौकशी अधिकारी तहसिलदार पुरंदर यांनी कळविले आहे. तसेच प्रकरणी दाखल सर्व कागदपत्रे, तक्रार अर्जदार यांचे लेखी व
तोंडी म्हणणे विचारात घेता तत्कालिन तलाठी यवत कैलास बाठे यांनी वेळोवेळी शासकीय
कामकाकाजात जाणीवपुर्वक हलगर्जीपणा केलेला दिसून येत आहे. त्याअर्थी, प्रमोद गायकवाड, (उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग पुरंदर) यांनी तत्कालिन तलाठी कैलास बाठे, (सध्या कार्यरत तहसिल कार्यालय पुरंदर) यांनी सुनावणी दरम्यान केलेला लेखी खुलासा तसेच तोंडी म्हणणे अमान्य करुन, चौकशी अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल मान्य करुन, कैलास बाठे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम-४ च्या (१)(अ)
अन्वये शासन सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.