दौंड : विधानसभा निवडणूक जाहिर झाल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून दौंड तालुक्यात नुसता टिका टिप्पणी आणि खालच्या भाषेचा शब्द प्रयोग पहायला मिळत आहे. आज दौंड शहरात खासदार लंके यांच्या झालेल्या सभेत याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी विद्यमान आमदार राहुल कुल यांना उद्देशून दहा वर्षे ज्यांची सत्ता आहे त्यांना माज आणि मस्ती खूप आहे अश्या खालच्या भाषेत टिका केली आहे आणि वेळ आल्यावर तुम्हाला एक एकाला सरळ करणार असा ईशाराही त्यांनी विरोधी गटाला दिला आहे.
वरील टिका करत असताना रमेश थोरात यांनी, आता तालुका सुजलाम, सुफलाम होऊन श्रीमंत झाला आहे, आता घरागणीस चारचाकी गाड्या आल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने एका एका गावातून किमान पन्नास, शंभर गाड्या घेऊन सभेला या असे आवाहन केले आहे. यावेळी खासदार निलेश लंके यांनीही आमदार राहुल कुल यांच्यावर टिका करत आम्ही चोवीस लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, आम्ही राज्यात नव्हे तर देशात कुठेही गेलो तरी लोक आम्हाला गराडा घालतात असे म्हणत आमची सत्ता आल्यानंतर आम्ही उलटे पाढे मोजल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा दिला.
थोरात यांनी बोलताना, दहा वर्षे ज्यांची सत्ता आहे त्यांना मस्ती आणि माज खूप आहे. त्यांनी सर्व शासकीय यंत्रनांचा गैरवापर केला आहे असा आरोप त्यांनी राहुल कुल यांचे नाव न घेता केला आहे. वेळ आल्यावर तुम्हाला एक एकाला सरळ करणार. रमेश थोरात हे शांत झालेत ते आता उराड फुकत नाहित. बाप गेला आणि पोराला वाऱ्यावर सोडलं असं लोकं म्हणतील म्हणून मी त्याला चेअरमन केलं अश्या पद्धतीने त्यांनी राहुल कुल यांच्यावर टिका केली आहे.
आता घरागणीस गाडी झाली आहे, एवढा श्रीमंत तालुका झाला आहे, सुजलाम, सुफलाम तालुका झाला आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त गाड्या आणून सभेला गर्दी जमवावी असे वक्तव्य रमेश थोरात यांनी केल्याने दौंड तालुक्याचा विकास झाला आहे आणि त्यामुळे तो सुजलाम, सुफलाम होऊन श्रीमंत झाला आहे याची ग्वाहीच रमेश थोरात यांनी दिली आहे असे मत आमदार राहुल कुल यांच्या गटाचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.