अहमदनगर – कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेले व हरवलेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे २० महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मूळ तक्रारदारांना मोबाईल परत केले आहेत.
असा लागला मोबाईलचा शोध
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अंमलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीतील तब्बल चार लाख वीस हजार रुपये किमतीचे २० महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
नागरिकांना आवाहन आणि चोरीतील मोबाईल परत मिळाले
मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग तसेच आयफोन कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही तक्रारदारांनी गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही सोडून दिली होती. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोना सलीम शेख, राजेंद्र फसले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ शिंदे यांनी कारवाई केली.
चोरीला गेलेले मोबाईल परत मिळालेल्या मोबाईल धारकांची नावे
संदीप संजय खंडागळे (रा. बोल्हेगाव, अहमदनगर), दिलीप रामकिसन शिंदे (रा.अरणगाव), नंदकुमार जालिंदर चोभे (रा.अरणगाव), आदिनाथ सोनवणे (रा.केडगाव), मयूर पोपट शिंदे (रा.कर्जत), वसंत संपत भोगडे (रा.साकत), सय्यद आरेफशह सलिमशह (रा. छत्रपती संभाजीनगर), अनिल झरेकर (रा. अहमदनगर), सचिन बबन कचरे (रा.विराज कॉलनी, अहमदनगर), ऋषिकेश बबन महांकाळ (रा. कोठला, अहमदनगर), विनीत मकासरे (रा.केडगाव, अहमदनगर), करण डहाळे (रा.माळीवाडा), विनय निसाद (रा. कल्याण रोड), रंभाजी भेटे (रा.अहमदनगर), सोविक दास (रा.पश्चिम बंगाल), अंकुश बेरड (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड), दीपक घोडके (रा.राहुरी) बाळासाहेब धस (देवळाली प्रवरा हल्ली राहणार अहमदनगर ) शेखर खेडकर (कडा) शेखर गुंदेचा (बुरुडगाव रोड) अशी मोबाईल मिळालेल्या मालकांची नावे आहेत.