विचार भावना आणि वर्तन यांची योग्य सांगड म्हणजेच निरामय आयुष्याची नांदी – डॉ. आनंद नाडकर्णी

दौंड : कै. ऍड. पी. व्ही. गायकैवारी ट्रस्ट दौंड आयोजित व्यख्यान आणि संवाद या कार्यक्रमात डॉ. आनंद नाडकर्णी (ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ) यांचे आनंदी माणूस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दीपप्रज्वलन डॉ. डि. एस. लोणकर, हरिभाऊ ठोंबरे, गुरुमुख नारंग, डॉ. सुनीता कटारिया, डॉ अमित बिडवे, अर्चना साने यांच्या हस्ते करण्यात आले आणि कै. ऍड. पी. व्ही. गायकैवारी यांच्या प्रतिमेस डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

ट्रस्टच्या कार्याचा आढावा हरिभाऊ ठोंबरे यांनी घेतला तर प्रास्ताविक ट्रस्टचे सर्वेसर्वा राघवेंद्र गायकैवारी यांनी केले. आपल्या मनोगतात गायकैवारी यांनी सांगितले कि या पुढील काळात देखील दौंड मध्ये विविध उपक्रम आणि वसंत व्याख्यान माले सारखी व्याख्यान माला सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आज पर्यंत ट्रस्ट च्या माध्यमातून आत्तापर्यंत ४५ विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी १४ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या दोन सुसज्ज रुग्णवाहिकांचा चालकाचा मासिक पगार व लागणारे इंधन ट्रस्ट च्या वतीने देण्यात येते. दौंड बार असोसिएशन साठी सुसज्ज असे वाचनालय ट्रस्ट च्या माध्यमातून उभारण्यात आले आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आपल्या व्याख्यान्यात ग्रोथ – (वाढ) म्हणजे नेमकं काय याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले. माणसाच्या आयुष्यात आस्था, करुणा, कृतज्ञता आणि नम्रता, तन्मयता या गुणांचा अंतर्भाव करून एक समृद्ध आयुष्य जगता येते असे सांगितले.
प्रेक्षकांमधून डॉ. अमित बिडवे, डॉ. सुनीता कटारिया, अर्चना साने, राजुशेठ ओझा आणि राजश्री बिराजदार यांनी डॉ. आनंद नाडकर्णी यांना प्रश्न विचारले त्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास देशपांडे यांनी केले तर सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुकडे, मिलिंद जोशी, श्याम शिरपूरकर, विनय कुकडे, प्रदीप म्हस्के, हरिभाऊ ठोंबरे, प्रसाद गायकवाड, दीपक गटणे, मोहन नारंग, वैभव टाटिया आदींनी
परिश्रम घेतले.
अमीर शेख यांनी आभार मानले..