‘पंढरपूर’ वारीसाठी ‘चौरंगीनाथ’ महाराजांच्या पालखीला 77 वर्षांपासून बैलजोडी देणारे ‘हंडाळ’ कुटुंबिय

दौंड : केडगाव ता.दौंड येथील प्रसिद्ध अश्या चौरंगीनाथ महाराज्यांच्या पालखीला पंढरपूर वारीसाठी गेल्या 77 वर्षांपासून बैलजोडी देण्याचे मोलाचे कार्य स्वर्गीय भाऊसाहेब बाळा हंडाळ यांचे कुटुंब करत आले असून या वर्षीही त्यांनी चौरंगीनाथ महाराजांच्या पालखीला आपली देऊन पालखीला बैलजोडी देण्याची 77वी पूर्ण केली आहे. एकाच कुटुंबाने इतकी वर्षे पालखीसाठी बैल जोडी देण्याचा हा एक प्रकारे विक्रमच म्हणावा लागेल.

या वर्षी चौरंगीनाथ महाराज पालखीला हंडाळ कुटुंबियांकडून बैलजोडी देऊन 77 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने या बैलजोडीची पूजा मठाचे महंत लक्ष्मननाथ महाराज तसेच दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्ष अजित शितोळे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्ष दत्तात्रय हंडाळ तसेच मल्हारी हंडाळ, सोपान हंडाळ, संतोष हंडाळ, सतीश हंडाळ, पंढरीनाथ हंडाळ, हनुमंत हंडाळ, सचिन हंडाळ, गणेश हंडाळ, निलेश हंडाळ, संजय हंडाळ, राजेंद्र मासाळ हे आवर्जून उपस्थित होते.