मुंबई : महानगर पालिका निवडणूकीचे वातावरण जोरात असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार संपूर्ण राज्यात आता एकूण 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समितींची निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम – 16 जानेवारीला ते 21 जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तर छाननी 22 जानेवारी आणि उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत असणार आहे. तर 27 जानेवारी रोजी साडे तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान 5 फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे.

खालीलप्रमाणे राज्यातील या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीची निवडणूक होणार आहे.
कोकण विभाग- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
संभाजीनगर विभाग – संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर अश्या या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींची निवडणूक होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्यात 25 हजार 482 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून मतदानासाठी 55 हजार कंट्रोल युनिट, 1 लाख 10 हजार बॅलेट युनिट, 25 हजार 482 मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी शौचालय अशी व्यवस्था केली जाणार आहे.







