विनोद गायकवाड
कुरकुंभ (दौंड): येथील श्री फिरंगाईमाता विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयात सावित्रीबाई फुले, सर्वपल्ली डॉ.राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ व भानोबा विद्यालय कुसेगाव असा सयुंक्त शिक्षक दिन कुरकुंभ येथे साजरा करण्यात आला.
महिला आरक्षण पासून ते लाडकी बहीण योजनेपर्यंत वेगवेगळी योजना आणून महिलांचे सबलीकरण करण्याचे शासनाने ठरवले आहे. शाळेत जे शिक्षण दिले जात आहे याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने दिशा ठरवली तर निश्चितपणे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य आहे..प्रत्येक गोष्टीतून येणारा अनुभव हा उत्तम शिक्षक असल्याचे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कुरकुंभ येथे उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या फिरंगाईमाता विद्यालयात आयोजीत शिक्षक दिन या कार्यक्रमात मांडले.
संस्थेतील सर्व शिक्षकांचा सन्मान सोहळा यावेळी आयोजीत करण्यात आला होता.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष अनिल शितोळे, सचिव सचिन शितोळे,संचालक किसन भालेराव,प्राचार्य नानासाहेब भापकर, प्राचार्य विनायक सुंबे, ग्रामपंचायत सदस्य, जयश्री भागवत,नंदा भागवत,आरती गिरमे, विद्या दोडके, माजी सरपंच आयुब शेख तसेच राजेंद्र शितोळे, राहुल शितोळे, नवनाथ गायकवाड, अरुण भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध विषयात आपल्या कर्तुत्वाचा ठसा निर्माण करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचा सन्मान आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला…आमदार राहुल कुल यांच्या सहित संस्थेचे अध्यक्ष केशवराव शितोळे, सचिव सचिन शितोळे,प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शिक्षकांना मार्गदर्शन केले…विद्यालयातील काही विद्यार्थी शाळेत शिक्षक बनले होते.यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपले विचार मांडले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे,माधुरी खांडेकर यांनी केले तर आभार विनायक सुंबे यांनी मानले.