‛त्या’ प्रकरणावरून खा.‛सुप्रिया सुळे’ संतापल्या, ‛गडकरीं’कडे केली हि विनंती

पुणे : पुणे शहरात लागोपाठ झालेल्या दोन अपघातांच्या घटनांमुळे खा.सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्याचे दिसत असून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांना यात लक्ष घालून त्वरित कार्यवाही सुरू करण्याची विनंती केली आहे.

खा.सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधताना, पुणे शहरातील नवले ब्रीज परिसरात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अपघातामध्ये सात जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. सदर ठिकाण अपघाताचे केंद्र बनले असून हे अतिशय खेदजनक आहे.

याठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी माझा रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. आवश्यक त्या उपाययोजना करुन येथील अपघात थांबविणे अतिशय गरजेचे झाले आहे.

येथील सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. याची आपण सर्वांनीच दखल घेणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच मा. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, या भागात सातत्याने अपघात होत आहेत. याशिवाय होणारी जिवितहानी देखील मोठी आहे.

हे लक्षात घेता या परिसरातील रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून संबंधित यंत्रणेला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत.आपण याबाबत सकारात्मक विचार करावा ही विनंती आहे असे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.