सुप्रिया सुळेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं

पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पवार (सुळे) विरुद्ध पवार असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं त्यामुळे विद्यमान खासदार यांनी त्यावेळी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यावर किरकोळ भाष्य करण्यास सुरुवात केली होती. आता मात्र त्या थेट अजित पवारांना डिवचत असल्याचे दिसत आहे. आज खडकवासला येथे बोलताना त्यांनी अजित पवारांवर बोलताना, दादा जेव्हा माझ्यासाठी प्रचार करत होते, तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत.. असं म्हणत त्यांना आता आपल्या पत्नीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत असल्याचेच त्यांनी न बोलता सांगून टाकले. त्यामुळे अजित पवारांना त्या डिवचण्याची संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

खालील लिंकवर जाऊन ‘सहकारनामा’ न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ न्यूज द्वारे मिळवा महत्वाच्या अपडेटhttp://खालील लिंकवर जाऊन ‘सहकारनामा’ न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ न्यूज द्वारे मिळवा महत्वाच्या अपडेट  https://www.youtube.com/@Sahkarnama

सुप्रिया सुळे ह्या आज खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी या दौऱ्यादरम्यान मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्या माध्यमांसमोर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अजित पवार हे सध्या पुणे ग्रामिणवर विशेष लक्ष देऊन आहेत. पुणे आणि इतर विभागातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायची त्यांची रणनीती आहे मात्र त्याच बरोबर आपली हक्काची बारामतीची जागा निवडून आणण्यासाठी ते कष्ट घेताना दिसत आहेत. त्यामुळे ते कायम आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे. हाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोला लगावला आहे.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सध्या वाकयुद्ध सुरु असल्याचे सर्वश्रुत आहे. सुप्रिया सुळे आता टिका करताना दिसत असल्या तरी अजूनही अजित पवारांनी या टिकांना तितकेसे मनावर घेतले नसल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर सुळे यांना माध्यमांसमोर अश्रू अनावर झाल्याचेही सर्वांनी पाहिले होते मात्र आता त्या मागील सर्व गोष्टी विसरून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत.
बारामतीमध्ये दादागिरी होतेय का या प्रश्नावर बोलताना त्यांनी, प्रश्न विचारला जातोय यातच सर्वकाही आलं असं म्हणत या बाबीला दुजोरा दिला आहे.