दौंड : बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दौंड तालुका दौरा संपन्न झाला. या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध गावांना भेट देत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी बोलताना त्यांनी, घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आणि विकासाला मत म्हणजे मोदींना मत असे वक्तव्य केले. तसेच आपल्याला विकासकामासाठी संधी द्यावी आपण रखडलेला विकास करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांनी दौंड तालुक्यातील सुमारे पंधरा गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वेगवेगळ्या गावांमध्ये भेटी देत असताना नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, जगदाळे यांच्या कार्याची स्तुती केली.