Sulochana Passed Away | सुलोचना दीदींच्या जडणघडणीचा कोल्हापूर साक्षीदार, सुलोचना दीदींच्या एक्झिट ने कोल्हापूरकर हळहळले

सुधीर गोखले

कोल्हापूर : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मधील सात्विक चेहऱ्याच्या प्रसन्न मुद्रेच्या सुलोचना दीदी यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

कोल्हापूरकरांच्या अतिशय जवळच्या असणाऱ्या सुलोचना दीदींच्या करियरची सुरुवात हि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओ मधून झाली. सुलोचना दीदींच्या जडणघडणीमध्ये कोल्हापूर चा सिंहाचा वाटा आहे. आपल्या सोज्वळ शालीन व्यक्तिमत्वाने मराठीतच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या सुलोचना दीदी या मूळच्या कर्नाटक प्रातांतील बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावच्या दीदींचे शिक्षण चौथीपर्यंत झाल्यानंतर चिकोडी मधील ऍड पुरुषोत्तम बेनाडीकर यांनी आपले मित्र मा विनायक यांना त्यांच्या प्रफुल्ल कंपनीमध्ये घेण्यास सांगितले आणि दीदींचा सोनेरी दुनियेतील प्रवास सुरु झाला. त्यावेळी त्यांना कित्तेक वेळेला अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली पण त्यांनी धीर सोडला नाही. नंतर हि प्रफुल्ल कंपनी पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर दीदीना आपले पती आबासाहेब चव्हाण यांच्या ओळखीने चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या प्रभात स्टुडिओ मध्ये काम मिळाले.

‘महारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटामध्ये त्यांना दासी ची भूमिका मिळाली अशा पद्धतीने भालजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या करियर ची सुरुवात करत असताना मीठभाकर हा मराठी चित्रपट पूर्ण झाला पण तो प्रदर्शित होण्या च्या काळातच महात्मा गांधींची हत्या झाली आणि प्रभात स्टुडिओ जाळून टाकण्यात आला यावेळी दीदींवर तर आभाळच कोसळले त्यांनी परत आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला परंतु पुण्याहून मा विठ्ठल वामनराव कुलकर्ण्यांचा निरोप घेऊन आले आणि दीदींचा प्रवास परत पुण्याच्या दिशेने सुरु झाला कोल्हापुरातील रविवार पेठेमध्ये सुलोचना दीदी वास्तव्यास होत्या तेथील जैन गल्लीत नारायणपूरे यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांचे वास्तव्य होते इथेच कांचन यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. ज्यावेळी स्टुडिओ पेटवण्यात आला त्यावेळी या ठिकाणाहून दीदींनी स्टुडिओ गाठला होता. 


अखेरपर्यंत फाळके पुरस्कारापासून वंचित तब्बल ३५० हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या आपली अविस्मरणीय अशी प्रतिमा तयार करणाऱ्या सुलोचना दीदींना शेवट्पर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार मात्र प्राप्त झाला नाही याची कोल्हापुरातील चित्रपट रसिक कलावंतांना खंत आहे.