अख्तर काझी
दौंड : दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे एकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या….
दौंड: तालुक्यातील जिरेगाव गावामध्ये एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली. राधेश्याम सुरेश शर्मा (वय 40,रा. आदर्श नगर, फातिमानगर मोशी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी महादेव बाबुराव गाढवे(रा. जिरेगाव ,दौंड) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 वा. च्या दरम्यान सदरची घटना घडली. फिर्यादी घरी असताना त्यांना ,शेतामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या अशोक दत्तात्रय मेरगळ यांचा फोन आला की मचाल खोपडात कोणीतरी गळफास घेतला आहे तुम्ही लवकर या. त्यामुळे फिर्यादी यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना तेथील लिंबाच्या झाडास नायलॉनच्या दोरीने कोणीतरी गळफास घेतल्याचे दिसले.
गळफास घेतलेला इसम राधेश्याम शर्मा असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी यांनी सदरची बाब कुरकुंभ पोलीस चौकीला कळविली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यास खाली उतरविले व उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयताचे कोणीच नातेवाईक मिळून न आल्याने फिर्यादी यांनी पुढील तजवीज होण्यासाठी दौंड पोलिसात खबर दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.