इंदापूर : (तुषार हगारे)
पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून विवाहितेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अकोले (ता. इंदापूर) येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील अकोले येथे असणाऱ्या मनीषा या महिलेला मुलगा होत नाही, पतीचे नातेवाईकांतील महिले सोबत असलेले अनैतिक संबंध आणि सततच्या मानसिक व शारिरीक छळास कंटाळून मनीषा हिने आपल्या ३ वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मनिषा महादेव दराडे (वय, 27 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिची लहान मुलगी कु.भाग्यश्री महादेव दराडे (वय .3 वर्षे) हिला सोबत घेवून तिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि, २१) रोजी उघडकीस आली आहे. मनिषा हिला मुलगा होत नाही, तुला सर्व मुलीच आहेत, आम्ही तुला सोडचिटटी देणार आहे असे म्हणून तिस वेळोवेळी तिचा पती मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून तिचा मानसिक व शारिरीक छळ करत होता. आरोपी पती महादेव चंद्रकांत दराडे आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये असलेल्या एका महिलेचे अनैतिक संबंध होते या सर्व प्रकारामुळे तिचा मानसिक व शारिरीक छळ होत असल्याने मनिषा महादेव दराडे हिने तिची लहान मुलगी भाग्यश्री दराडे हिच्यासह अखेर अकोले येथील अशोक यशवंत गायकवाड यांचे विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची फिर्याद विवाहीतेचे वडील नवनाथ विठोबा खैरे (वय, 65 रा. दादेगाव ता.आष्टी जि.बीड) यांनी दिल्याने भिगवण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दडस पाटील करीत आहेत.