दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल हे तालुक्यातील नागरिकांच्या अडचणींना घेऊन किती जागरूक असतात याची प्रचिती वेळोवेळी दौंडकरांना येत असते. अश्याच एका प्रसंगात आमदार राहुल कुल यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मजूरीचे काम करणाऱ्या एका कुटुंबाला सुमारे 25 लाख रुपये मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे.
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील एका शेतामध्ये ऊसतोडणी करीत असताना विष्णू करण मोरे या ऊसतोड मजुराच्या ३ महिने वय असलेल्या लहान बाळाचा बिबट्याच्या हल्ल्यात १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला होता. अवघ्या तीन महिने बाळाचा अश्या प्रकारे मृत्यू झाल्याने मोरे कुटुंब पूर्णपणे खचून गेले होते. या कुटुंबाचे आमदार राहुल कुल यांनी सांत्वन करत धीर दिला होता आणि शासनाकडे या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता.
आमदार कुल यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून अवघ्या एक महिन्यातच एकूण २५ लाख रुपयांची मदत शासनाने वन विभागामार्फत जाहीर झाली. मुलाच्या आई – वडिलांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अंकुश खरात, वनरक्षक श्रीमती शितल मेरगळ उपस्थित होते.