मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना महामारीनेे देशातील आणि
राज्यातील आर्थिक गणितेच बदलून टाकली आहेत. कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या तर दळण वळणाच्या साधनांवरही गंभीर परिणाम झाले.
असाच आर्थिक फटका बसण्याचा प्रकार ‛एसटी’ वर ही झाला आहे.सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या एसटी’लाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे या एसटीला संकटातून बाहेर काढण्यासाठी आता राज्य सरकार सरसावले आहे.
संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘एसटी’समोरील वाढलेली आव्हानं, महसुलात झालेली घट लक्षात घेऊन ‘एसटी’ महामंडळाला 550 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या निर्णयामुळे एसटी महामंळाच्या समोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास नक्कीच मदत होईल असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
‘एसटी’ महामंडळाच्या समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित या बैठकीला परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे, तसेच एसटी महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.