सहकारनामा विशेष
उषा भाऊसाहेब जगदाळे या आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेली लेक. त्यांनी केलेल्या पुरुषार्थी कामामुळे आज त्यांचे कौतुक खुद्द राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्मवरून केले आहे.
रुपाली चाकणकर यांनी उषाताई यांच्याबाबत आपल्या शब्दांत लिहिताना शालेय जीवनात अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीमुळे उषाने राष्ट्रीय पातळीवर खो- खो मध्ये तब्बल अकरा सुवर्णपदक मिळविली आहेत. राज्यस्तरीय महाराष्ट्र टीमची कर्णधारही होती. घरच्या परिस्थितीमुळे उषाला पुढील शिक्षण घेता आलं नाही. विवाहानंतरही उषाने जिद्द सोडली नाही पतीच्या खांद्याला खांदा लावत पतीला दुग्ध व्यवसायात मदत केली. अशातच २०१३ साली महावितरणची जाहीरात निघाली. खेळाडू कोट्यातून तिची निवड महावितरणमध्ये “तंत्रज्ञ” म्हणून झाली.
युनिट ऑफिसला काम करताना एक महिला असूनही कार्यालयीन पोस्टिंग न मागता हे क्षेत्र महिलांसाठी केवळ कार्यालयीन न राहता फिल्ड वर्कमध्ये ही कुठे महिला कमी नाहीत याचे उदाहरण उषाने घालून दिले आहे.
फोटोवरुन आपल्या लक्षात येईल की उषा स्वतः त्या पोलवर चढुन रिपेअरिंगच काम करत आहे. लॉकडाऊन काळामध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवत. ग्राहक तक्रार निवारण केंद्राची कामे ही अखंडीत करत. शिवाय घरी दोन जुळी मुले, सासू-सासरे, पती, सर्वाची जबाबदारी सांभाळऱ्या उषा ताईंच्या जिद्दीला रुपाली चाकणकर यांनी सलाम करत कौतुक केले आहे.