मुंबई : पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी च्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या राष्ट्रवादी च्या नेत्यांची आज भाजप सरकारमध्ये मंत्रीपदी निवड केल्याने त्यांनी केलेले आरोप हे खोटे होते हे आज सिद्ध झाले असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी, काहीजण मला सांगून गेले की तिथे काहीतरी घडतंय त्यामुळे तिथं जाऊन तुम्हाला कळवतो पण नंतर समजलं की त्यांनीच तिथं जाऊन शपथ घेतली असे मिश्किल उद्गार शरद पवारांनी काढताच एकच हशा पिकला.
तर पक्षाचं नाव घेऊन कुणी काही दावा करो माझा लोकांवर विश्वास आहे त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या पाठिंब्यावर जोमाने कामाला लागू असे त्यांनी सांगितले. अजित पवारांसोबत गेलेल्या काहींनी आज मला सांगितले की आम्हाला काही न सांगता सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे यावरचाही पडदा लवकरच उठेल. आजचा प्रकार मला नवीन नाही 1980 साली 58 पैकी 6 सोडले तर सर्व पक्ष सोडून गेले पण मी 5 लोकांचा नेता होऊन पुन्हा पक्ष बांधणी केली आणि पुढील निवडणुकीत 79 जागा आम्ही काबीज केल्या. आणि जे पक्ष सोडून गेले ते पुन्हा सामील झाले. त्यामुळे आम्ही आता लोकांमध्ये जाऊ आणि पुन्हा जोमाने पक्ष बांधणी करू असे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या हिताचे त्यांनी निर्णय न घेतले नाहीत त्यांना हे सुधारावे लागेल अन्यथा आम्ही त्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले असून जे नियम मोडून गेले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.