देऊळगावगाड़ा सोसायटीवर भाजप चे वर्चस्व, 13 पैकी 12 जागेवर विजय

दौंड : दौंड तालुक्यात राजकीय दृष्टया महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देऊळगावगाड़ा येथील विविध सहकारी सोसायटीवर आमदार राहुल कुल (भाजप) चा झेंडा फडकला असून
यावेळची राजकीय लढत चुरशीची पहावयास मिळाली होती. आमदार राहुल कुल यांच्या गटाकडून श्री सदगुरु नारायण महाराज जनसेवा पॅनेल विरूद्ध माजी आमदार रमेश थोरात गटाकडून श्री सदगुरु नारायण महाराज सहकार पॅनेल अशी समोरा समोर लढत होती.
या आधी देऊळगावगाड़ा सोसायटी वर श्री सदगुरु नारायण महाराज जनसेवा पॅनेल यांची सत्ता होती तर या सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. बारवकर हे होते. १३ सदस्य संख्या असलेल्या या सोसायटी निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात गटाकडून श्री सदगुरु नारायण महाराज सहकार पॅनेलचे भटक्या विमुक्त जाती व जमात प्रगर्वातील प्रकाश टूले हे बिनविरोध झाले होते तर १२ जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. या चुरशीच्या लढतीत माजी आमदार रमेश थोरात गटाला आमदार राहुल कुल गटाने आसमान दाखवत विजय संपादन करण्यात त्यांना यश आले आहे.

श्री सदगुरु नारायण महाराज जनसेवा पॅनेलचे उमेदवार विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : सर्वसाधारण गट – अभिजित जगताप, भाऊसो बारवकर, अप्पासो बारवकर, भुजंग बारवकर, अंकुश बारवकर, खंडू माने, पोपट बारवकर, कल्याण शितोळे. महिला प्रतिनिधी गट- मंगल गिरमे, पद्मावती शितोळे. इतर मागासवर्गीय गट – अकबर भाई शेख. अनुसूचित जाती व जमाती गट-रविन्द्र मोरे हे आहेत. श्री सदगुरु नारायण महाराज सहकार पॅनेलचे उमेदवार पुढील प्रमाणे : सर्वसाधारण गट-आदिनाथ बारवकर, जालिंंदर बारवकर, रामदास बारवकर, विश्व्नाथ बारवकर, संजय बारवकर, दत्तात्रेय अरुण शितोळे, दत्तात्रेय बाळासो शितोळे, विजय शितोळे. अनुसूचित जाती व जमाती गट- मुकेश खंडाळे. इतर मागासवर्गीय गट- सागर जाधव. महिला प्रतिनिधी गट- वैशाली चौधरी, छबुबाई होले. भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील प्रकाश टूले हे बिनविरोध झाले आहेत.
श्री सदगुरु नारायण महाराज जनसेवा पॅनेलचे नेतृत्व भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, मारुती कोकरे, डी. डी. बारवकर, अकबर शेख, गोरख जगताप यांनी केले असून श्री सदगुरु नारायण महाराज सहकार पॅनेलचे नेतृत्व देऊळगावगाड़ा येथील सरपंच विशाल बारवकर,रामदास डेंम्बळ कर, अक्षय बारवकर, भाऊ शितोळे, राजवर्धन जगताप, जालिंदर बारवकर, दत्ता शितोळे यांच्या वतीने करण्यात आले होते.