इस्लामिक नूतन वर्षाच्या शुभारंभानिमित्त दौंडमध्ये मुस्लिम बांधवांकडून वृक्षारोपणाचा उपक्रम

दौंड (अख्तर काझी) : इस्लामिक नवीन वर्षाच्या निमित्ताने येथील दावत- ए -इस्लामी इंडिया, गरीब नवाज रिलीफ फौंडेशनच्या वतीने दौंड मध्ये वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

परमेश्वराकडून आपणाला देणगी लाभलेल्या निसर्गाचे आपणच संवर्धन केले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत फाउंडेशनने पुढाकार घेत शहरातील नूर प्राथमिक शाळा व उस्मानअली शाब्दि उर्दू हायस्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले. इस्लामिक नवीन वर्षाचे औचित्य साधित शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून येथील शाही आलमगीर मशिदीचे मुख्य विश्वस्त युसुफ इनामदार, गरीब नवाज रिलीफ फंड चे प्रमुख सोहेल कुरेशी, इसामुद्दिन मन्यार, इम्रान नालबंद ,अनिस इनामदार, मुदस्सीर शेख, इम्रान बेग, रमीज शेख ,नौशाद खान आदी उपस्थित होते. उस्मानअली उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका झरीना काझी, खैरूनीसा नाईकवाडी तसेच सर्व शिक्षक वृंदांनी सदर उपक्रमास सहकार्य करीत शुभेच्छा दिल्या.