दौंड : नवरात्रोत्सव निमित्ताने कुरकुंभ येथील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांना दौंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकारी विकी सरवदे यांच्या पुढाकाराने उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
दौंडमध्ये सर्वच समाजाचे सण, उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याची शहराची परंपरा आहे, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, तसेच शहरातील जातीय सलोखा- भाईचारा असाच अबाधित राहावा या उद्देशाने सदरचा उपक्रम राबविला असल्याचे विकी सरवदे यांनी यावेळी सांगितले.
पक्षाचे पदाधिकारी प्रकाश भालेराव, मा. नगरसेवक राजू बारवकर, राजू जाधव ,मयूर मदने ,महेश भोईटे, अमित मिसाळ,विकास चितारे,
सोनू ओहोळ, रोहन जाधव, पवन निकम यांनी आयोजन केले.