लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने दौंड मध्ये सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्ताने शहरात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
लहुजी सेना ग्रुप (भाजी मंडई) व जनसेवक रुपेश बंड यांच्या पुढाकाराने येथील गांधी चौकामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले .शिबिरास दौंडकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 230 गरजूंनी शिबिराचा लाभ घेतला. आमदार राहुल कुल, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासो पवार, डॉ.समीर कुलकर्णी तसेच शहरातील विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिबीरास भेट देत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आदित्य भोसले, सुरज सकट, बाबू मोघे, विशाल कोयलकर, अर्जुन काळे, आकाश पळसे, पप्पू आरके, काळू गुपचे, कुणाल बंड आदींनी शिबिराचे आयोजन केले.

लहुजी यंग ब्रिगेडच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने रणजीत खंडागळे यांचा
अण्णाभाऊ साठे ,लहुजी वस्ताद साळवे यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जयंती निमित्ताने आयोजकांच्या वतीने स्वप्निल शहा (धार्मिक) रवींद्र कांबळे (राजकीय) सचिन कुलथे (सामाजिक) मनोहर बोडखे (पत्रकारिता) मंगेश साठे (कला) डॉ. विशाल मिसाळ (वैद्यकीय) जयंत पवार (शैक्षणिक) योगिता रसाळ (समाज गुणगौरव) या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नितीन तूपसौंदर्य, गणेश खुडे, बाळू तूपसौंदर्य, ओंकार खुडे, बाबू खुडे, निखिल ससाणे, संकेत तूप सौंदर्य, शुभम तूपसौंदर्य, गणेश तूप सौंदर्य, महेश गायकवाड, सौरभ आगलावे, पृथ्वी खंडाळे, धीरज दिवटे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.