दौंड : आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दौंड आगारास पाच नवीन बस( एसटी) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राहुल कूल यांच्या हस्ते या पाच नवीन बसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज पार पडला.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, दौंड आगाराचे व्यवस्थापक, पदाधिकारी, चालक-वाहक, कर्मचारी उपस्थित होते. दौंडकर प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे यावेळी राहुल कुल म्हणाले.

दौंड आगाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदारांसह उपस्थित मान्यवरांनी नवीन बस मधून शहरामध्ये फेरफटका मारीत प्रवासाचा आनंद घेतला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आमदार राहुल कुल यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती आज संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जात आहे. दौंड मध्ये सुद्धा येथील अहिल्यादेवी होळकर सहकार चौकामध्ये जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे तसेच गुरुमुख नारंग, गौतम साळवे, नाना जगताप, राजू बारवकर, अमोल काळे, अश्विन वाघमारे, मंगेश चलवादी, मयूर शिंदे, गणेश पवार, नरेश डाळिंबे, सुरेश निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. धनगर समाजाचे अध्यक्ष मोहन पडवळकर, रासप पक्षाचे अध्यक्ष नागेश बेलूरकर ,मलिक कलपनूर, अरुण गावडे, राजू सोनवलकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.