गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यासाठी पुण्यातील 2 शार्प शुटर! पोलिसांकडून शोध सुरु

पुणे

पंजाब आणि संपूर्ण देशात हडकंप माजवीणाऱ्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची आता नवनवीन माहिती समोर येत आहे. सिद्धू मुसेवालाला मारण्यासाठी जे शार्प शुटर आले त्यामध्ये पुण्यातील दोन शार्प शुटरचा समावेश असल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे. हे दोन्ही शार्प शूटर पुण्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील असल्याची माहितीही समोर आली आहे.
संतोष जाधव (आंबेगाव, जि.पुणे) आणि सौरभ महाकाळ ( जुन्नर, जि.पुणे ) अशी या दोन शार्प शुटर्सची नावे असून सिद्धू मुसेवालाला मारण्यासाठी आलेल्या वेगवेगळ्या राज्यातील 8 शार्प शूटर्सपैकी हे दोनजण पुण्याचे आहेत.

जाधव आणि महाकाळ या दोघांची नावं आणि फोटोही पोलिसांनी उघड केले आहेत. संतोष जाधव आणि महाकाळ हे सराईत गुन्हेगार असून संतोष जाधव याने ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा गोळ्या झाडून खून केला होता तेव्हापासून तो फरार झाला आहे. संतोष जाधव यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो मोक्यातील आरोपी आहे. सिद्धू मोसेवालाच्या हत्येनंतर पुणे क्राइम ब्रांचकडून त्याचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे.

असा झाला होता सिद्धू मुसेवालाचा खून…
पंजाब पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला याची हत्या होण्या अगोदर केकडा नामक सराईत हा मुसेवालाच्या घरी जाऊन त्याचा फॅन असल्याचे सांगत संपूर्ण माहिती गोळा केली. त्यानंतर त्याने शार्प शूटर्सना मुसेवाला थार जीपमधून कोणत्या रस्त्याने कुठे जात आहे याबाबत माहिती दिली आणि त्यासोबत अंगरक्षक, त्याची बुलेट फ्रुफ गाडी नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर काहीवेळातच मुसेवालाला एका कॉर्नरवर घेरून त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
सिद्धू मुसेवालाच्या हात्येमागे कुख्यात गँगस्टर सचिन बिष्णोई असल्याचा दावा पंजाब पोलिस करत असून
हल्लेखोरांनी वापरलेली बोलेरो जीप ही राजस्थानवरुन आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचा या खूनात सहभाग असल्याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे कनेक्शन आता पुण्याशी जोडले गेले आहे.