अख्तर काझी
दौंड : श्री राम नवमी उत्सव समितीच्या वतीने दौंडमध्ये श्रीराम नवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रामनवमी साजरी करण्यात आल्याने यात युवा वर्गाने मोठा सहभाग नोंदवला.
श्री रामनवमी उत्सव समितीच्या वतीने राम भक्तांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीरामाच्या भव्य प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने राम लल्ला भक्तांनी सहभाग घेतला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेची आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार राहुल कुल, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गणेश जगदाळे, सतीश थोरात, नरेश वाल्मिकी ,अकबर शेख ,अमोल काळे ,फिलिप अँथोनी, हरिभाऊ ठोंबरे ,कानिफनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
आयोजकांच्या वतीने आमदार राहुल कुल व प्रेमसुख कटारिया यांचा सत्कार करण्यात आला. उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल कोंडके, उपाध्यक्ष अभिजीत सोलंकी, श्रीकांत गुजर ,,शुभम राऊत ,आकाश पलंगे ,प्रसाद धुमाळ आदींनी सोहळ्याचे आयोजन केले. गांधी चौकातील राम मंदिर ट्रस्टच्या वतीने ही श्रीरामाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. राजेंद्र ओझा, रामेश्वर मंत्री, जितू झेंडा, प्रीतम लोहिया, रमेश मंत्री, आदींनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले.