केडगाव, दौंड : शुक्रवार दिनांक १५.८.२०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री दत्त मंदिर बोरीपार्धी गावठाण येथे श्री दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत श्री दत्त सेवा महीला भजनी मंडळाचा काकडा भजनाचा कार्यक्रम, दुपारी ३ ते ६ या वेळेत सार्वजनिक भजनाचा कार्यक्रम, सायं. ६ ते ७ या वेळेत हरिपाठ व नंतर फराळ प्रसाद होणार असुन रात्री १० ते १२ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य ह.भ.प शामसुंदर महाराज ढवळे यांचे हरी कीर्तन व नंतर श्री दत्त सेवा एकतारी भजनी मंडळाच्या जागराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची विस्तृत माहिती मंडळाचे अध्यक्ष बंडूशेठ नेवसे यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमासाठी सौ.सविता आप्पासाहेब ताडगे (मा.व्हा.चेअरमन ख.वि.संघ दौंड) सौ.रोहिणी दत्तात्रय नेवसे (उपसरपंच बोरीपार्धी) सौ.अम्रपाली उद्धाव गायकवाड (मा.उपसरपंच बोरीपार्धी) सौ.मनीषा सुभाष बर्वे (सदस्य ग्रा.पं.बोरीपार्धी),सौ सुनंदा राजेंद्र भोसले (मा.सदस्य ग्रा. पं.सदस्य बोरीपार्धी), सौ.स्नेहा मल्हारी सोडनवर (संचालिका स्वरसाधना प्रतिष्ठान पुणे), सौ.रेश्मा अनिल गडधे (आनंद ॲटोलाईन्स), सौ.पुष्पा विलास कोळपे (अभि फर्निचर), सौ.मंगल अनिल नेवसे, (नेवसे कृषी फार्म), सौ.प्रियांका सर्वजित ताडगे यांच्या वतिने अन्नदान करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे अवाहन मंडळाचे मार्गदर्शक भजनरत्न मल्हारीदादा सोडनवर यांनी केले आहे. दत्त सेवा मंडळाच्या वतिने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षी मंडळाच्या वतिने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत ताडगे यांनी सांगीतले.