4 वर्षांच्या मुलीचे अपहरण! नरबळीची संशय, पोलिसांकडून पती-पत्नी जेरबंद

पुणे : नरबळीसाठी ४ वर्षाच्या लहान मुलीला पळविणाऱ्या आरोपींना शिताफिने पकडून त्यांच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात जुन्नर पोलिसांना यश आले आहे.

घडलेली हकीकत अशी की, जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २३/०७/२०२२ रोजी रात्री ११:०० वाजता पासुन जुन्नर शहरात पोसई श्री दिलीप पवार, पो हवा भरत मुठे, चालक पो.ना.संतोष पठारे असे रात्रगस्त करीत असताना, दिनांक २४/०७/२०२२ रोजी ०१:०० वाजताचे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. मंदार जवळे व विकास जाधव, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस स्टेशन यांनी रात्रगस्त अधिकारी दिलीप पवार यांना फोनद्वारे माहिती दिली की, पोलीस आयुक्तालय, पिपंरी चिंडवड, चिखली पोलीस स्टेशन गु.र. नं. ३८३ / २०२२, भा.द.वि कलम ३६३ मधील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय ४ वर्षे, (रा. संतकृपा हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली, पुणे) हीस कोणीतरी
अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचे कायदेशिर रखवालीतुन फिर्यादी यांचे संमतीशिवाय
पळवुन नेले आहे.

सदर संशयीत आरोपीचे मोबाईल लोकेशन हे जुन्नर पोलीस स्टेशनचे हृद्दित असल्याचे डी.सी. पी काकासाहेब डोळे सो, ए.सी.पी प्रशांत अमृतकर, तसेच ए.सी.पी. पद्माकर घनवट, पिंपरी चिचंवड आयुक्तालय यांनी आदेशित केल्याने पोलिसांनी तात्काळ पोलीस स्टाफला घेवुन जुन्नर शहरातील महादेवनगर, जुने एस टी स्टॅन्डजवळ संतोष मनोहर चौगुले यांचे राहते घरासमोर जावुन घराची पाहणी केली त्यावेळी त्यांना त्या घरात एक महिला व एक पुरुष तसेच एक लहान मुलगी दिसली. त्यावेळी मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग, व विकास जाधव, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस स्टेशन यांनी वॉट्सॲपवर पाठविलेला पिडीत मुलीचा फोटो पाहुन ती मुलगी तीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सदर महिला व तीचे पती तसेच सदर अल्पवयीन मुलीस जुन्नर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर
विभाग, विकास जाधव, पोलीस निरीक्षक यांचेसमक्ष सदर महिलेकडे अधिक
विचारपुस केली असता, तीने पोलिसांना अगोदर उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागली.

त्यामुळे हा वेगळाच काहीतरी प्रकार असावा असा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी तीच्या पतीकडे अधिक तपास केला असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आणि त्या इसमाने कबुली दिली की, सदरची मुलगी
हि त्याची पत्नी विमल संतोष चौगुले हिने चिखली, पुणे येथील बहिणीच्या घरा शेजारी राहणारी असून तिने ती पळवुन आणली होती. पोलिसांना यात नरबळीचा संशय असून त्या दृष्टीनेही तपास सुरु आहे. वेगळ्या पद्धतीने केलेगेलेल्या लहान मुलीच्या अपहरनाच्या या प्रकाराने पोलिसही अवाक झाले आहेत.

सदरची पिडीत मुलगी व महिला आरोपी विमल संतोष चौगुले, (वय २८ वर्षे) व तीचा पती संतोष मनोहर चौगुले, (वय ४१ वर्षे, दोन्ही रा. महादेवनगर जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोनि इंगवले व दरोडा
प्रतिबंधक पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचे ताब्यात पुढील कायदेशिर
कारवाईकामी देण्यात आले.

सदरची कारवाई ही मा. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण,
मा. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. मंदार जवळे, उपविभागीय
पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. विकास जाधव,
जुन्नर पोलीस स्टेशन, पोसई, दिलीप पवार, पो हवा भरत मुठे, चालक पो ना संतोष
पठारे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सपोनि तौफिक सय्यद
चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय, पुणे हे करीत आहेत.