‘वर्षा’ बंगल्याची दारं शिवसैनिकांसाठी अगोदर उघडली असती तर..! शिवसेना आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली खद-खद व्यक्त, आमदार नाराज होण्याचे मोठे कारण आले समोर!

मुंबई : अनेक शिवसेना आमदरांनी (Shivsena Mla) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची साथ सोडून शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांसह आसाम गाठले. या सर्व घडामोडी इतक्या जलद घडल्या की नेमकं काय झालं आणि कसं झालं आणि का झालं हे कुणालाच समजत नव्हते. आता या सर्व गोष्टींचा हळू हळू उलगडा होऊ लागला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना औरंगाबाद चे बंडखोर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) पत्र लिहून या सर्व गोष्टींवरून पडदा उचलला आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी या पत्रामध्ये शिवसेना आमदारांवर कसा अन्याय होत होता. त्यांना वर्षा बंगल्याबाहेर कसे ताटकळत उभे रहावे लागायचे याबाबत खुलासा केला आहे. आणि काल जशी शिवसैनिकांसाठी वर्षा बंगल्याची दारं उघडली गेली तशी अगोदर उघडली गेली असती तर हि वेळ आली नसती असे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी लिहिलं आहे.

हेच ते आमदार संजय शिरसाट यांचं पत्र

हे पत्र संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले असून ते पत्र खुद्द एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवर ट्वीट केले आहे. या पत्रातून वर्षा बंगल्यात असणारे बडवे आणि इतर लोक उद्धव ठाकरे यांपर्यंत शिवसेना आमदारांनाच येऊ देत नसल्याचा उल्लेख करण्यात आला असून शिवसेना आमदारांना कायम दुज्यापनाची वागणूक दिली गेल्याचे म्हटले आहे.

औरंगाबादमधून शिवसेनेचे तब्बल 5 आमदार एकनाथ शिंदे यांसोबत असून संजय शिरसाट यांनी या पत्रामध्ये अयोध्या (ayodhya) दौऱ्याचाही उल्लेख केला आहे. ज्यावेळी आदित्य ठाकरे (aditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्याला निघाले त्यावेळी आम्ही काही आमदार त्यांसोबत निघालो मात्र विमानात बसण्याअगोदर आम्हाला आदेश आला की तुम्ही अयोध्याला जाऊ नका आणि आम्ही सर्वजण माघारी घरी आलो. हि सर्व कारणे देताना यात महत्वाची बाब त्यांनी उल्लेख केलेली म्हणजे शिवसेना आमदारांची त्यांच्या विभागातील विकास कामे होत नव्हती, त्यांना फंड दिला जात नव्हता मात्र ते ज्यांच्याविरोधात होते त्यांना फंड दिला जाऊन त्यांची कामे व्हायची. हि सर्व परिस्थिती एकनाथ शिंदे यांना माहिती होती आणि त्यांनी सर्व आमदारांना यावेळी दिलासा देऊन पाठीमागे उभे राहिल्याचे या पत्रात म्हटले आहे.

एकूणच शिवसेना आमदारांनी बंड करण्याचे प्रमुख कारण आता पुढे येऊ लागले असल्याचे म्हटले जात असले तरी नेमके हेच कारण आहे की संजय राऊत म्हणतात त्या प्रमाणे इडी,भीती, आमिष हे कारण आहे हे लवकरच समजणार आहे.