दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी ग्रामपंचायत पोट निवडणूकित शिवसेना आपला उमेदवार उतरवणार असल्याची माहिती वाखारी शिवसेना शाखा प्रमुख संदीप मोरे यांनी दिली आहे. प्रभाग 1 मध्ये हि पोटनिवडणूक होणार असून अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून येथील एका ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले होते त्यामुळे आता येथील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
2018 च्या वाखारी ग्रामपंचायत निवडणूकित तिरंगी लढत पहायला मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेने अतिशय कडवी झुंज दिली होती. जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने दौंड तालुक्यात शिवसेना यश संपादन करत आहे त्याच धर्तीवर महेश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आपला उमेदवार वाखारी ग्रामपंचायत पोट निवडणुकीत उतरवून यश संपादित करेल असा विश्वास शाखा प्रमुख संदीप मोरे यांनी व्यक्त केला आहे.