‘एकनाथ शिंदे’ यांच्यानंतर ‘आढळराव पाटील’ यांना शिवसेनेचा मोठा ‘दणका’

पुणे : राज्यात शिवसेनेच्या (shivsena) एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री (cm) पदावरून पायउतार केल्यानंतर शिवसेनेने बंडखोर आमदार आणि खासदारांवर कारवाई सुरु केली आहे. काल एकनाथ शिंदे यांची पक्ष नेतेपदावरून हाकालपट्टी केली होती आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव (shivajirao adhalrao patil) पाटील यांचीही शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना ठपका ठेवण्यात आलाय. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराम आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला सपोर्ट केल्यानंतर पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अगोदरही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांची शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

आढळराव पाटील यांच्यानंतर आता अजून कुणावर कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेकांनी शिंदे यांना छुपा आणि उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेनं बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षातून हाकालपट्टी करण्याचे काम सुरू केलं आहे.

शिवसेनेतून हाकालपट्टी झालेले शिंदे गटात सामील होताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे. मात्र तरीही तळागाळातील शिवसैनिक हा खऱ्या अर्थाने कुणाच्या पाठीमागे आहे हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल यात शंका नाही.