मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांनाही अखेर कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत खुद्द शरद पवार यांनीच माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी माहीती देताना ‛माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले आहे.
शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेकांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत सोशल मीडियावर संदेश व्हायरल केले आहेत.