आगामी जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

दौंड : (अब्बास शेख) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि.२६ जून रोजी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेता सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावीत आणि स्वतःला उमेदवार घोषित करण्यापेक्षा जनतेतून मागणी व्हावी असे मत जिल्हा आणि तालुक्यातील नेत्यांनी व्यक्त केले.

पक्षाची ही बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दौंड येथे घेण्यात आली. या बैठकीला पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुक्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या बैठकीमध्ये जिल्हा परिषद गटातील तसेच पंचायत समिती गणातील आणि नगरपालिका वॉर्डातील सर्व इच्छुक उमेदवारांचे मत जाणून घेण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मा.आमदार जगन्नाथ शेवाळे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ  टुले, महिला जिल्हाध्यक्षा सौ.भारतीताई शेवाळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल खान, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, युवती जिल्हाध्यक्षा कु. दुर्गाताई चोरगे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ तसेच दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.