स्वतःचे ठेवायचे झाकून अण दुसऱ्याचे पहायचे वाकून… आले आले.. वाटले वाटले, अण आम्ही मात्र कालच बाटले

दौंड : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ग्रामिण भागातील अनेक गावांमध्ये एका महाशयांने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. हातात मतदारांच्या स्लीपा सोबत आलिशान गाडी त्या गाडीत प्रत्येक गावाचे नाव लिहून ठेवलेल्या छोट्या मोठ्या मनीमाऊ बॅग अण कुणाला संशय येऊ नये म्हणून बाजूला बसवलेले सोशल मीडियावर चालणारे पंटर असा काहीसा हा लवाजमा आहे.

आपले वाटून झाले की सोशल मीडियावर अगोदरच टाईप करून ठेवलेला मसाला वेबसाईट च्या माध्यमातून छापून बोंबाबोंब करून धूम ठोकायची अण पहा पहा आले आले… लोकशाही धोक्यात आली, मनीमाऊ वाटून झाली असा काहीसा बनाव करायचा असा हा एकसूत्री कार्यक्रम सध्या रात्रीचे मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर सुरु आहे. आधी मधी हुकी आली तर दोन चार जातीवादी पोस्ट टाकायच्या, स्वतः अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा आव आणायचा अण दोन हाना पण जुना पुढारी म्हणा असा कांगारावळा करायचा हे ठरलेलं आहे.

मात्र आता लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी अश्या बनवाबनवी कार्यक्रमाला पक्के ओळखले असून डोळ्यात सलणाऱ्या आणि कायम विकासाच्या मुद्द्यावर चॅलेंज करणाऱ्या एका उमेदवाराला पराभूत करण्यासाठी हा सर्व आकांडा तांडव सुरु असल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. आता अश्या पोस्ट लोकं सीरिअस घेण्याऐवजी मनोरंजन म्हणून वाचू लागले असून जसे पान चघळून झाल्यावर ते पिचकारी मारून थुंकले जाते तश्या या पोस्ट सोशल मीडियावरून लोकं डिलीट करू लागले आहेत आणि स्वतःचे ठेवायचे झाकून अण दुसऱ्याचे पहायचे वाकून असा टोमणा या बहाद्दरांना लगावू लागले आहेत.