आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत शहीद जवान माध्यमिक विद्यालयाने पटकाविला चॅम्पियन चषक

दौंड : दौंड स्पोर्ट्स फाउंडेशन, इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशन व सीनियर इन्स्टिट्यूट, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुका अंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन ऍड. प्रशांत गिरमकर(सचिव- इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशन) यांच्या हस्ते करण्यात आले.

शहर व तालुक्यातील मेरी मेमोरियल हायस्कूल, सेंट सेबेस्टियन हायस्कूल, संत तुकडोजी विद्यालय, शेठ जोतीप्रसाद विद्यालय,स्व. लाजवंती गँरेला हायस्कूल, लर्न अँड प्ले हायस्कूल ,शहीद जवान माध्यमिक विद्यालय, मंगेश मेमोरियल हायस्कूल, श्रीयोग माध्यमिक विद्यालय(बेटवाडी) शाळांच्या एकूण 150 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेचा चॅम्पियन चषक शहीद जवान माध्यमिक विद्यालयाने पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. क्षितिजा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी रेल्वे इन्स्टिट्यूट चे एस. एस. शिंदे, एन. बी. नाडगौडा, गौरव ढवळे ,संजय सोनवणे, इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशनच्या मधुबाला जगदाळे, वर्षाराणी गायकवाड आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या पालकांतर्फे संतोष आटोळे यांनी मनोगत व्यक्त केले, विद्यार्थिनी भक्ती आटोळे हिने हार्मोनियम वर महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.सॅव्हीओ वेगस, मेहबूब शेख, नितीन शिरसाठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिरसाठ यांनी केले.