भाजपचे जेष्ठ नेते खा. गिरीश बापट यांचे निधन

पुणे : भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांचे आज २९ मार्च रोजी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट हे प्रकृती अस्वस्थ असतानाही कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते. बापट यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळत आहे.