Categories: क्राईम

‛सोलापुर’ मध्ये लव्ह पाकिस्तान लिहिलेल्या फुग्यांची विक्री, पहा मुस्लिम बांधवांनी काय केले

सोलापूर : आज सर्वत्र ईद उल अजहा (Eid ul Adha) म्हणजे आपल्या भाषेत बकरी ईद (Bakri Eid) मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सोलापूर मधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे एक षडयंत्र रचले गेले असून यामागे कोण आहे याची चर्चा संपूर्ण सोलापूरमध्ये सुरू आहे.

ईद चे नमाज पठण करण्यासाठी सोलापुरात ईदगाहवर गेलेल्या मुस्लिम बांधवांना तेथे एक फुगेवाला लव्ह पाकिस्तान असे लिहिलेले फुगे विकत आहे याची माहिती समजली. मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन ते फुगे व्यवस्थित पाहिले असता त्यावर लव्ह पाकिस्तान असा मजकूर आणि सोबत पाकिस्तानी झेंडा काढल्याचे लक्षात आले.
त्यामुळे हे एक षडयंत्र असल्याचे मुस्लिम बंधावांना शंका आली आणि त्यांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्वरित फुगेवल्याला आपल्या ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी त्याला सोबत घेऊन गेले.

ऐन ईद च्या दिवशी तो फुगेवाला लव्ह पाकिस्तान लिहिलेले फुगे तेथे कासाकाय घेऊन आला याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून मुस्लिम समाजातील लोकांनी या घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. हे फुगे येथे कसे आले, कुणी तयार केले आणि त्याची होलसेल विक्री कोणी केली याबाबत सखोल चौकशी होऊन यातील व्यक्तींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

56 मि. ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago