दौंड : २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जुने मित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते स्नेह मेळाव्याचे ज्यामुळे आपल्या जीवनातील जुन्या, गोड आठवणी पुन्हा एकदा या माजी विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या. हा स्नेह मेळावा होता खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील व्होकेशनल (व्यावसायिक अभ्यासक्रम) बॅच १९९८ ते २००० या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा.
हेही वाचा – https://sahkarnama.in/dada-you-were-late-but-your-real-place-was-here-home-minister-amit-shah/
दिनांक ३० जुलै २०२३ रोजी हा स्नेहमेळावा मोठया थाटामाठात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याची सुरूवात महाविद्यालयातील उपस्थित गुरूजनांचे औक्षण आणि फुलांची उधळण करत करण्यात आले. सर्व गुरूजनांचे स्वागत करून त्यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले तसेच यावेळी सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मुख्य कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. सर्व उपस्थित गुरूजनांचा श्रीफळ,शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यासाठी प्रा. डॉ. श्रीपाद ढेकणे (ओ. एस. डी. कौशल्य विकास मंत्रालय) प्रा. डॉ. संजय चाकणे, प्रा. पंडित होले ( विभागप्रमुख व्यावसायिक अभ्यासक्रम), प्रा. शैलेश सोनार ( ऑफिस मॅनेंजमेन्ट), प्रा. दिशा वांबूरकर (मार्केटिंग अँण्ड सेल्समनशिप) प्रा. रमेश लोंढे (ऑफिस मॅनेजमेंन्ट), प्रा. नितिन पहिलवान( अकौंटिंग अँण्ड ऑडिटिंग),प्रा. प्रविण मुरकुटे (पायाभूत अभ्यासक्रम), प्रा. बाळासाहेब थोरात (शिक्षक प्रतिनिधी) प्रा. विजय रस्ते ( एन. सी. सी. प्रमुख) श्री. गणेश जाधव या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या मेळाव्याला सर्व माजी विद्यार्थी व प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन अविनाश सरोदे व ज्योती कड यांनी केले तर मेळाव्याला सर्वाना नाष्टा चहा पाणी व भोजन व्यवस्था निवेदिता व हरीष भोसले यांनी केली मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने झाला. हा स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी दिपंकर गायकवाड, प्रा. विनायक घुले, उदय सोनवणे, रूपेश पतंगे, सागर चौधरी, रुपाली कुतपेल्ली योगीनी वेद, गोकुळ पवार या माजी विद्यार्थानी परिश्रम घेतले.