शाळांची ‛घंटा’ उद्यापासून वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‛शाळा’ सज्ज

सुधीर गोखले

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आता पालकांसह विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याचे वेध लागले असून उद्या दि १५ जून पासून शहरातील तसेच जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा शाळांचीघंटा वाजणार असून शिक्षण विभाग तसेच शाळांनी विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशीच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

उद्या पासून पहिली ते बारावी चे वर्ग सुरु होणार असून विद्यार्थ्यांच्या वर्दळीमुळे परत एकदा शाळांचे आवार गजबजून जाईल.
जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग महापालिका प्राथमिक शिक्षण समिती तर्फे सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांच्यासुरक्षेच्या दृष्टीने शाळांमधील सी सी टीव्ही कॅमेरे आरोग्याच्या दृष्टीने शाळा परिसर निर्जंतुकीकरण आणि रंगरंगोटी झाली असून शाळा परिसरात रांगोळी उत्साही वातावरण कसे राहील विद्यार्थ्यांबरोबर पालकांचे मनोधैर्य कसे वाढेल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

उद्या दि १५ रोजी शाळांमध्ये विशेष प्रवेशोत्सव उपक्रम राबवण्यात येणार असून प्रभात फेरी पटसंख्येच्या पूर्ततेसाठी गृहभेटी विशेष संपत मोहीम राबवली जाईल. विद्यार्थ्यांना गणवेशासह मोफत पाठय पुस्तकांचे वाटप तसेच गोड खाऊचे वाटप देखील होणार आहे विद्यार्थी पालकांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे.